• Sun. Feb 15th, 2026

रविवारी शहरात बौध्द वधु-वर मेळाव्याचे आयोजन

ByMirror

Feb 1, 2024

तथागत बुध्दिस्ट सोसायटीचा उपक्रम; समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

समाजातील घटस्फोटीत, विधवा आणि विधूर पुरुष, महिलांसाठीही होणार परिचय मेळावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने शहरात रविवारी (दि.4 फेब्रुवारी) बौध्द वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. न्यु टिळक रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सकाळी 12 वाजता हा वधु-वर मेळावा पार पडणार असून, याचा समाजबांधवांना लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष संजय कांबळे व सचिव सत्येंद्र तेलतुबडे यांनी केले आहे.


या बौध्द वधु, वर परिचय मेळाव्यात अविवाहित मुला, मुलीसाठी योग्य स्थळ निवडण्याकरीता तसेच समाजातील घटस्फोटीत, विधवा आणि विधूर पुरुष, महिलांसाठी देखील योग्य पुनर्विवाहासाठी स्थळ पाहिले जाणार आहे. युवक-युवतींच्या परिचय मेळाव्यानंतर घटस्फोटीत, विधवा, विधूर यांचा परिचय मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी येताना विवाह इच्छुकांचा एक पासपोर्ट व उभा फोटो बॉयडेटासह आणावे. वधु-वर मेळावा संस्थेचे कायदे सल्लागार ॲड. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. अधिक माहितीसाठी वधु-वर सूचक मंडळाचे प्रमुख अशोक बागुल 9881827892 व सचिव विष्णू ठोंबे 9021223434 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *