• Fri. Sep 19th, 2025

मार्कंडेय विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

ByMirror

May 2, 2023

देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे -विलास पेद्राम

अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष विलास पेद्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर, सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, विश्‍वस्त राजू म्याना, माजी मुख्याध्यापक रावसाहेब क्षेत्रे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिप छिंदम यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीतसह महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा… गीत सादर केले.


विलास पेद्राम म्हणाले की, महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. बाळकृष्ण सिद्दम यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक हुतात्मे झाले. त्यांना नमन करुन महाराष्ट्र दिन साजरा होत असल्याचे सांगितले. शरद क्यादर यांनी कामगार वर्गाचा देशाच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे. श्रमिकांच्या बळावर देशाची विकासात्मक दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल विष्णू रंगा यांनी केले. आभार प्रा. बत्तिन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षक प्रमोद चन्ना, शिक्षक प्रतिनिधी प्रा. भानुदास बेरड, शिक्षकेतर प्रतिनिधी निलेश आनंदास, विद्यालयातील सर्व अध्यापक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *