जागतिक पशुचिकित्सा दिवसाचा उपक्रम
पशुपालकांना लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक पशुचिकित्सा दिवसानिमित्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.29 एप्रिल) जनावरांची मोफत तपासणी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जुने बस स्थानक जवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालय हॉस्पिटलमध्ये होणार्या या शिबिराचा पशु पालकांना लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे यांनी केले आहे.
शनिवारी सकाळी 9 वाजता शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या शिबिरामध्ये मोफत श्वानदंश रोग प्रतिबंधक (रेबीज) लसीकरण, धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण तसेच जंत प्रतिबंधक औषधे देण्यात येणार असल्याची माहिती जायंटस् वेल्फेअर फाउंडेशनचे संजय गुगळे यांनी दिली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. शशिकांत कारखेले, डॉ. वर्षा साबळे, डॉ. ज्ञानेश्वर काळे, जायंटस् ग्रुप ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा पूजा पातुरकर, विद्या तन्वर आदी प्रयत्नशील आहेत. शिबिरासाठी अजय मेडिकल, शारदा एजन्सी व कडूस डिस्ट्रीब्यूटर्सने सहकार्य केले आहे.