महिलांच्या कर्तृत्ववाचा जागर
आदर्श समाजासाठी जिजाऊंचा वारसा महिलांनी पुढे चालवावा -संपूर्णाताई सावंत
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सत्काराने स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. सर्वच क्षेत्रातील एकवटलेल्या महिलांनी आपल्या कर्तृत्ववाचा जागर करुन महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.
सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संपूर्णाताई सावंत यांच्या पुढाकाराने महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर शिलाताई शिंदे, सुरेखा कदम, मराठा सोयरिक ग्रुपच्या राज्याध्यक्षा रजनीताई गोंदकर (शिर्डी), प्रदेश सचिव राजश्रीताई शितोळे, शहराध्यक्षा सुरेखा कडूस, अनभुले मेडिकल फाउंडेशनच्या संचालिका डॉ. दीपाली अनभुले, शाखा अध्यक्ष डॉ. कल्पना ठूबे, अॅड. सूनंदाताई तांबे, अॅड. स्वाती जाधव, लतिका पवार, मीनाक्षी वागस्कर, वंदना निघुट, शारदा पवार, छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई सांगळे, नगरसेविका संध्याताई पवार, सविता मोरे, सुरेखा भोसले, अमल ससे, सीमा गोबरे, अनुपमा धहम, शर्मिला म्हस्के, डॉ. सिमरन वधवा, छायाताई राजपूत, नीलम परदेशी, माधवी मांढरे, स्वाती कदम, पदमा गांगर्डे, सारिका गाडे आदींसह विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात संपूर्णाताई सावंत म्हणाल्या की, स्त्री शक्तीचे रुप असून, तिने आपल्यातील क्षमता ओळखता आले पाहिजे. राजमाता जिजाऊंचा वारसा पुढे चालविताना मुलांवर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संस्कार घडवून आदर्श समाज निर्माणासाठी महिलांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. महिलांना निर्भयपणे व आत्मसन्मानाने उभे करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
शीलाताई शिंदे म्हणाल्या की, महिलांनी उंबरठा ओलांडून सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. महिला सशक्त असून, त्यांना कुटुंबाने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड एका कुटुंबाप्रमाणे महिलांना साथ देत असून, स्त्री सशक्तीकरणाची चळवळ चालवित असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेखा कदम यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्वच क्षेत्रात काम करत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत तिने आपले कर्तृत्व गाजवले असल्याचे सांगितले.
रजनीताई गोंदकर म्हणाल्या की, स्वाभिमानाने महिलांनी समाजात आपले स्थान निर्माण केले आहे. मोठ्या आत्मविश्वासाने महिला वाटचाल करत आहे. महिलांना समाजाकडून फक्त सन्मानाची अपेक्षा आहे. तिने आपल्या कर्तृत्वाने सर्व काही मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले.