सिनेअभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
सिनेअभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या अनिता लक्ष्मण काळे यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. सिनेअभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील माऊली सभागृहात झालेल्या नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार, राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, विश्वस्त सुजाता कासार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
अनिता काळे या भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे चालवून त्या सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करत आहे. तसेच जिल्हा परिषदेतील शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्याची मोहिम देखील सुरु केली आहे. त्या हिरकणी ग्रुपच्या अध्यक्ष व मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असून, महिला सक्षमीकरण व गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.