• Sun. Nov 30th, 2025

शहरात प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांनी काळे झेंडे फडकवून केली निदर्शने

ByMirror

Mar 16, 2023

जुनी पेन्शनसाठी आरपारची लढाई, संपाचा तिसरा दिवस

जिल्हा परिषदेवर धडकली मोटार सायकल रॅली

अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या तिसर्‍या दिवशी गुरुवारी (दि.16 मार्च) शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारींनी न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर काळे झेंडे फडकवून जोरदार निदर्शने केली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात झालेल्या या ठिय्या आंदोलनात सरकार विरोधात घोषणा दिल्या.


प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे, धनंजय म्हस्के, सविता हिंगे, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरमुडे, राज्य कार्याध्यक्ष अन्सार शेख, शेखर उंडे, गोवर्धन पांडुळे, प्रा. विलास वाळुंजकर, प्रा. राजेंद्र जाधव, धनंजय म्हस्के, उध्दव उगले, प्रा. रविंद्र देवढे, प्रा. आप्पासाहेब पोमणे, प्रा. मोहन कांजवणे, प्रा. भाऊराव नाडेकर, प्रा. अर्चना काळे, प्रा. आरती साबळे, प्रा. दिपाली रक्ताटे, प्रा. प्रतिभा पवार, प्रा. प्रतिमा शेळके, प्रा. अनिता चव्हाण, महाराष्ट्र बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शेवाळे, नितीन कराळे, रविंद्र वर्पे, सिताराम मुळे, योगेश शेळके, दादासाहेब आगळे,जगदीश कोंगे, रवींद्र बुधवंत, अशोक कदम, मनोज पवार, विजय म्हस्के, गणेश गोरे, दीपक वराट, शरद पुंड आदी सहभागी झाले होते.


गुरुवारी सकाळी न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतरांनी जमण्यास सुरुवात केली. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या आंदोलकांमुळे रस्ता देखील व्यापला गेला होता. एकच मिशन, जुनी पेन्शनच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांना मेस्मा कायद्याची भिती दाखविणार्‍या शासनाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.

कर्मचार्‍यांचे जिव्हाळ्याचे प्रश्‍न मार्गी न लावता त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकार हुकुमशाही पध्दतीने वागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तर जुनी पेन्शन मिळत नाही, तो पर्यंत संपाचा लढा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करुन, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे तयारी दर्शविण्यात आली. जुनी पेन्शनसाठी आरपारची लढाई सुरु असून, आंदोलन अधिक तीव्र करण्याचे व जुनी पेन्शन नाकारल्यास सत्ताधार्‍यांना पुढील निवडणुकीत पायउतार करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांची भाषणे झाली.


दुपारी न्यू आर्टस् महाविद्यालय येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण करीत मोटारसायकल रॅली जिल्हा परिषदेवर धडकली. यावेळी निदर्शने करुन जिल्हा परिषदेत सुरु असलेल्या आंदोलनात सहभाग नोंदविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *