अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळा मुख्याध्यापक शिक्षकेतर जिल्हा समन्वय समितीच्या वतीने मोर्चाच्या समारोपनंतर झालेल्या बैठकीत संपाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेण्यात आले.
यामध्ये इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेला संबंधित पर्यवेक्षक, केंद्रसंचालक आदींनी उपस्थित राहून काळ्याफिती लावून परीक्षेचे कामकाज करावे, मस्टरवर स्वाक्षरी करू नये, इतर वर्गाना सुट्टी द्यावी व समन्वय समितीच्या सदस्यांनी तालुका स्तरावर संघटनेच्या कार्यालयात जिल्हास्तरावर माध्यमिक सोसायटीत सकाळी 11:00 ते 2:00 या वेळेत उपस्थित रहावे, मुख्याध्यापकांनी दहावी व बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळास्तरावर ताब्यात घ्यावे, मात्र पेपर तपासणीवर बहिष्कार टाकावा, शिक्षकांनी बोर्डाचे पेपर तपासणीसाठी ताब्यात घेऊ नयेत, हे निर्णय करण्यात आले आहेत. तर शाळेने कोणताही निर्णय परस्पर घेऊ नये, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
