धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देऊन राबविलेल्या उपक्रमाची दखल व सन्मान -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल विश्व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र राज्य) कोपरगाव तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. रावसाहेब जगताप व उपाध्यक्षपदी ह.भ.प. राजेंद्र वाणी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी या नियुक्तीची घोषणा करुन जगताप व वाणी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
ह.भ.प. रावसाहेब जगताप व उपाध्यक्षपदी ह.भ.प. राजेंद्र वाणी यांचे धार्मिक कार्यासह सामाजिक कार्य सुरु आहे. धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देऊन त्यांनी राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमाची दखल घेत त्यांची कोपरगाव तालुका अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष भालसिंग यांनी सांगितले. नवनिर्वाचित पदाधिकारी जगताप व वाणी यांनी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रीय योगदान राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
या निवडीबद्दल त्यांचे अखिल विश्व वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते, जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे, जिल्हा सचिव कीर्तनकार दिलीप महाराज साळवे, जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर उल्हारे, शहराध्यक्ष अॅड. सुनील महाराज तोडकर, नगर तालुका अध्यक्ष घनश्याम म्हस्के, जामखेड तालुका अध्यक्ष भीमराव मुरूमकर, शहर कार्याध्यक्ष महेश कांबळे, महिला तालुका अध्यक्षा प्रतिभा साबळे, संत चरित्र ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, धामापूर सोसायटीचे चेअरमन भास्करराव मांजरे, व्हाईस चेअरमन बाळासाहेब भाकरे, प्रकाश वाघ, देवानाना गाडे, रामराव गाडे, योगेश्वर जगताप, सचिनराव ताजणे, बाळासाहेब पगार यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
