देशभक्तीची स्फुर्ती जागविणार्या गीतांचे बहारदार सादरीकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीत गायन स्पर्धेत यश संपादन केले. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीची स्फुर्ती जागविणार्या गीतांचे सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
नुकतीच सेंट विवेकानंद हायस्कूलच्या वतीने देश रंगीला या देशभक्तीवर गीत गायन स्पर्धा पार पडली. यामध्ये मोठ्या संख्येने शहरातील शाळांच्या समुहाने सहभाग नोंदवला. अशोकभाऊ फिरोदियाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय या दोन्ही गटात बक्षिस पटकाविली.
पाचवी ते सातवी इयत्तेच्या प्रथम गटात शाळेला उत्तेजनार्थ 1100 रुपये रोख व स्मृचिन्ह बक्षिस प्रदान करण्यात आले. या गटामध्ये आनंदी कुलकर्णी, तनिष्का नांगरे, परमेश्वरी जोशी, सिद्धी आडेप, इरा कुलकर्णी, अर्नवी शिंदे, शमिका तिरमल, स्वरा गोंधळी, सावरी सांगळे या शालेय विद्यार्थिनींचा सहभाग होता.
तर आठवी ते दहावी इयत्तेच्या द्वितीय गटात शाळेने तृतीय क्रमांकाचे 5100 रुपये रोख व स्मृतिचिन्ह बक्षिस पटकाविले. या गटात आदिती रेखी, अक्षरा खेले, अनुष्का धामणे, नुपूर कुलकर्णी, सृष्टी मैड, राजेश्वरी मुळे, श्रुतिका ढवळे, अक्षरा शिंदे, जय गांधी (तबला), जीत गुप्ता (ढोलकी) या शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या सर्व विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका रेणुका पुरंदरे व सुवर्णा मलमकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त सुनंदा भालेराव, अॅड. गौरव मिरीकर, प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला व सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षकांनी स्पर्धेत यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
