• Wed. Nov 5th, 2025

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शास्त्रीय संगीत परीक्षेत यश

ByMirror

Feb 1, 2023

विशेष श्रेणीत 24, तर प्रथम श्रेणीत 17 विद्यार्थी चमकले

अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन विक्रमी विशेष योग्यता व प्रथम श्रेणीत येण्याचा बहुमान पटकाविला आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने ही परीक्षा घेण्यात (मुंबई) आली होती. यामध्ये विशेष श्रेणीत 24 व प्रथम श्रेणीत 17 विद्यार्थी चमकले आहे.


या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्‍वस्त मंडळाच्या सदस्या सुनंदा भालेराव, मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापिका सुषमा चिटमील, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, रविंद्र शिंदे, आशा सातपुते आदी उपस्थित होते.

या यशाबद्दल संस्थेचे सह कार्यवाह गौरव फिरोदिया व संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा यांनी शास्त्रीय संगीत परीक्षेत यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक परशुराम मुळे यांचे मार्गदर्शन लाभले. संगीत परीक्षेचे दहा ते पंधरा गुण देखील दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरले जातात. ही परीक्षा प्रारंभिक परीक्षा, प्रथम प्रवेक्षिका आणि प्रवेशिका पूर्ण असे तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते.

शास्त्रीय संगीत परीक्षेचा निकाल पुढील प्रमाणे:-
प्रारंभिक परीक्षेमध्ये विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण- श्रद्धा शिंदे, आर्या शिंदे, महिमा सोनार, अनुष्का दैठणकर, स्वस्ती म्हस्के,कांक्षिनी पांढरे, राधिका पाटणकर, आदिती सेवक, श्रेयसी नागुल, वैष्णवी बोठे, भार्गवी घुले, उन्नती शित्रे, नक्षत्रा हजारे, आराध्या सुरपुरिया, अनुजा गर्जे, श्रुतिका दरेकर, समृद्धी कुलट, श्रावणी काळे, श्रेया वाडेकर, दुर्वा मेहेर, वैष्णवी नाईक, दर्पण गुगळे, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण- वैष्णवी नाईक, दर्पण गुगळे.
प्रवेशिका प्रथम परीक्षेत विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण- मुलांशु परदेशी, जागृती म्हस्के,परेश मिसाळ, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण- रत्नप्रभा पवार, कार्तिक लोंढे, सम्यक गुगळे, अक्षरा मंगलारम, गौरी बांदल, संचित क्षीरसागर, स्वराज गुगळे, रुद्रप्रताप पवार, तनिष्का चोभे.

प्रवेशिका पूर्ण परीक्षेत विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण- स्वरिका जासूद, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण- सिद्धी घाणेकर, मंजिरी घबाडे, अदिती भूमकर, श्रद्धा चव्हाण, शिवानी देवकर, वैदेही साठे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *