अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया पँथर सेनेचा राज्यव्यापी मेळावा सोमवारी (दि. 30 जानेवारी) 12 वाजता अहमदनगर शहरातील न्यू टिळक रोड येथे माऊली मंगल कार्यालयात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष पवन भिंगारदिवे, युवक जिल्हाध्यक्ष सागर ठोकळ, शहर जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, उत्तर जिल्हाध्यक्ष राम दरोडे, कानिफ पोपळघट यांनी केले आहे.
या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती, राज्यात वाढत चालेली जातीय विषमता, धर्मांधता यावर मार्गदर्शन करुन पँथर सेनेच्या पुढील वाटचालीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पँथर सेनेचे राज्य अध्यक्ष विनोद भोळे, महासचिव सचिन तिवारी, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सरचिटणीस जितेश जगताप, प्रवक्ता बंटीभाऊ सदाशिवे, महाराष्ट्र सचिव बापूसाहेब लष्करे, भीमराज गोटे, संघटक मीनाक्षी बोर्डे उपस्थित राहणार आहे.