मेहेर इंग्लिश स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर लाल बावटा जनरल कामगार युनियनमध्ये सहभागी
नवीन करारासाठी ट्रस्टशी चर्चा करुन समन्वयाने प्रश्न सोडविण्यास संघटना प्रयत्नशील
अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची बैठक भाकपच्या पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकित नवीन पगार वाढीच्या करारावर कामगारांशी चर्चा करण्यात आली. तर मेहेर इंग्लिश स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतरांनी देखील संघटनेचे सभासदत्व स्विकारले.
लाल बावटेचे सचिव अॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकप्रसंगी युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, खजिनदार प्रभावती सदस्य पाचारणे, सुनिल दळवी, अनिल फसले, सुभाष शिंदे, राधाकिसन कांबळे, सुनीता जावळे आदींसह युनियनचे सदस्य असलेले कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या कराराची मुदत 31 मार्च 2023 मध्ये संपत असून, नवीन करारासाठी लवकरच ट्रस्टची चर्चा करण्याच्या पार्श्वभूमीवर युनियनची बैठक पार पडली. युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार म्हणाले की, मागील काही वर्षात कामगारांच्या एकजुटीने करार होऊन कामगारांना चांगले वेतन मिळाले व कामगार कायद्याप्रमाणे सुविधा प्राप्त झाल्या. पुढील करारात देखील कामगारांना चांगला पगार मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, हा करार ट्रस्ट व संघटनेच्या समन्वयातून करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मागील करार करताना मोठा संघर्ष करावा लागला. हा करार ट्रस्टने तडजोडीने सोडवावा. कामगार कायद्याप्रमाणे सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी युनियन प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मेहेर इंग्लिश स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतरांनी वेतन आणि इतर सुविधांबाबत प्रश्न मांडले. त्यांच्या प्रश्नाबाबत संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन अॅड. टोकेकर यांनी दिले.
यावेळी मेहेर इंग्लिश स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतरांनी वेतन आणि इतर सुविधांबाबत प्रश्न मांडले. त्यांच्या प्रश्नाबाबत संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन अॅड. टोकेकर यांनी दिले.