• Thu. Mar 13th, 2025

राहुरी येथील अ‍ॅट्रोसिटी व विनयभंग प्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन

ByMirror

Nov 20, 2022

घरासमोर जनावरे धुण्यावरुन झाले होते वाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- जनावरे धुण्यावरुन झालेल्या वादात राहुरी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रोसिटी व विनयभंगाचा आरोप असलेल्या बाचकर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.


28 ऑक्टोबर रोजी कलम जातीवाचक शिवीगाळ करुन विनयभंग केल्याप्रकरणी बाचकर यांच्याविरुद्ध आरोप करून तसा गुन्हा नोंदविला होता. पीडित महिलेने त्यात म्हटले होते की, आरोपी इसम त्याची जनावरे धूत असलेले पाणी घरासमोर आल्यामुळे तिने जनावर दुसरीकडे धुवा असे सांगितले. आरोपींना त्याचा राग येऊन त्यांनी पीडित महिलेस जातीवाचक शिवीगाळ केली व विनयभंग केला. हा प्रकार पीडित महिलेने तिच्या भावास सांगितला असता, आरोपींनी त्यास देखील शिवीगाळ करून मारहाण केली.


गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपींनी अहमदनगर येथील अ‍ॅड. महेश तवले, अ‍ॅड. संजय दुशिंग, अ‍ॅड. अक्षय दांगट यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला. सदर प्रकरणात आरोपीचे वकिलांनी युक्तीवाद करून आरोपींची बाजू मांडली व न्यायालयास निदर्शनास आणून दिले की, गुन्हा हा खोटा असून, तो नोंदविण्यासाठी मोठा विलंब झाला आहे. केवल जनावर धुतलेले पाणी घराच्या समोर आल्याचा राग मनात ठेऊन नोंदविलेला आहे. तसेच सदरची घटना ही सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही, त्यामुळे अनुसूचित जाती जमाती कायदा लागू होत नाही. सरकारी पक्षातर्फे आरोपी यांचे वकील गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे व आरोपींनी अटक करणे आवश्यक आहे, तसे न झाल्यास तो गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणतील असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस जामीन दिला आहे. आरोपी तर्फे अ‍ॅड. महेश तवले, अ‍ॅड. संजय दुशिंग व अ‍ॅड. अक्षय दांगट यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *