• Sat. Mar 15th, 2025

शहरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय शिबिर उत्साहात

ByMirror

Nov 15, 2022

जिल्हा भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी व नागरिकांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची जिल्ह्याची जंम्बो कार्यकारणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय शिबिर उत्साहात पार पडले. राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात जिल्ह्याची जंम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जिल्हा भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


नगर-मनमाड रोड येथील हॉटेल रुचिरा येथे झालेल्या या एक दिवसीय शिबिरात राष्ट्रीय सल्लागार गजानन ठाकरे, महाप्रदेश अध्यक्ष रामू घरत, व्याख्याते प्रेमकुमार पालवे, राज्य प्रभारी निरीक्षक ह.भ.प. वाल्मिक महाराज जाधव, कायदे सल्लागार अ‍ॅड. गजानन ठाकरे, अविनाश म्हात्रे, ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर माऊली सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग आदींसह राज्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात ज्ञानेश्‍वर माऊली सोनवणे यांनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. मानव अधिकार या विषयावर डॉ.प्रेमकुमार पालवे यांनी व्याख्यानात कायदे विषयक माहिती दिली. या कार्यक्रमात राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष आहेर यांच्या हस्ते करण्यात आली.
या शिबीरात जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर माऊली सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग, महिला जिल्हाध्यक्ष ह.भ.प. हिराताई मोकाटे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष संगीता नवले, जिल्हा सचिव अंकुश सापते, शहराध्यक्ष दिलीप महाराज साळवे,, शहर उपाध्यक्ष संतोष बुर्‍हाडे, नगर तालुका महिलाध्यक्षा प्रतिभा साबळे, संगमनेर तालुकाध्यक्ष लखन राऊत, कोपरगाव तालुकाध्यक्ष रावसाहेब जगताप, राहुरी तालुकाध्यक्ष अधिक खैरे, नेवासा तालुकाध्यक्ष ह.भ.प. मंगेश महाराज वाघ, शेवगाव तालुकाध्यक्ष ह.भ.प. जालिंदर महाराज निकम, जामखेड तालुकाध्यक्ष मिमराव मुरूमकर, पाथर्डी तालुकाध्यक्ष महादेव हरी पालवे यांची जंम्बो कार्यकारणी जाहीर करुन या नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे विजय भालसिंग, संगिता नवले, महादेव पालवे गुरुजी यांना समाज सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर म्हणाले की, मानवाधिकार व त्याची मुल्य जोपासण्याचे काम जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन करत आहे. महागाई, गरिबी व बेरोजगारीच्या प्रश्‍नांमुळे सर्वसामान्य भरडला जात असताना, त्यांच्यावर अन्याय-अत्याचर होत आहे. हा अन्याय दूर करुन त्यांचे हक्क अबाधित ठेवण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रेमकुमार पालवे म्हणाले की, समाजात न्याय व अन्याय समजल्यास वंचितांना न्याय मिळवून देता येणार आहे. मनुष्याला त्याच्या हक्काची जाणीव करुन देऊन त्यांच्या हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. भ्रष्टाचार थांबविणे व महिलांना संरक्षण देण्याच्या प्रमुख उद्देशाने कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राज्य प्रभारी निरीक्षक ह.भ.प. वाल्मिक महाराज जाधव यांनी जिल्ह्यात चांगले संघटन निर्माण झाले असून, सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे विविध क्षेत्रातील व्यक्ती संघटनेला जोडले गेले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पदाच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आभार जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *