तर शुक्रवारी श्रीरामपूरला बैठकीचे आयोजन
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात चर्चा करुन पुढील आंदोलनाची दिशा ठरणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या मागण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत चर्चा करुन संघटनेची भविष्यात दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी (दि.8 नोव्हेंबर) शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी 2 वाजता बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. तर शुक्रवारी (11 नोव्हेंबर) साखर कामगार हॉस्पिटल नेवासा रोड, श्रीरामपूर येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व ईपीएस 95 पेन्शनरधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष एस.एल. दहिफळे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, उपाध्यक्ष बाबूराव दळवी यांनी केले आहे.
शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, पारनेर व अहमदनगर येथील ईपीएस 95 पेन्शन धारकांनी शहरातील बैठकिला उपस्थित रहाण्याचे कळविण्यात आले आहे. या बैठकित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशव्यापी बैठका होऊन ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या प्रश्नावर पुढील दिशा ठरवून दिल्लीत 7 व 8 डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार्या देशव्यापी आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे. शुक्रवारी राहुरी, संगमनेर, राहता, कोपरगाव, नेवासा, अकोले येथील ईपीएस 95 पेन्शनधारक उपस्थित राहणार आहे.