जातीयवादी प्रवृत्तींना लगाम लावण्यासाठी लोकशाही विचारधारेने आम आदमी पार्टीचे कार्य -राजेंद्र कर्डिले
अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नागरिकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. या शिबिरातून आम आदमी पार्टीची विचारधारा व कार्याची नागरिकांना माहिती देण्यात आली.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बहिरनाथ वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले व कार्याध्यक्ष भरत खाकाळ यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुमय्या खान, माया कोल्हे, मोहन पोकळे, प्रदीप कराड, अशोक पवार, आम आदमी पार्टीचे दिलीप घुले, संपतराव मोरे, महेश घावटे, प्रकाश फराटे, गणेश मारवडे, गणेश जगदाळे, डॉ.सुहास मर्डीकर, मनोहर माने, रवी सातपुते, विक्रम क्षीरसागर, अशोक डोंगरे आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले म्हणाले की, हुकुमशाही, जातीयवादी व घराणेशाही प्रवृत्तींना लगाम लावण्यासाठी लोकशाही विचारधारेने आम आदमी पार्टीचे कार्य सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हित हे केंद्रबिंदू मानून पक्ष कार्य करत आहे. दिल्लीत अनेक विकास कामांच्या धर्तीवर पंजाबमध्ये सत्ता मिळविण्यात यश आले आहे. महाराष्ट्रात देखील आम आदमी पार्टी चांगला पर्याय म्हणून पुढे येत असून, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी या मुलभूत सुविधांना प्राधान्य देऊन शहरासह राज्यात कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
