• Wed. Oct 15th, 2025

शहरात राष्ट्रवादी केले महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन

ByMirror

Oct 6, 2022

महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणार्‍या दशमुखी रावण जाळून सिमोल्लंघन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन करण्यात आले. विकसीत महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी सिमोल्लंघन करुन वेदांतासारखे प्रकल्प गुजरातला नेणारे, केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर, इंधन दरवाढ, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा, 50 खोके नॉट ओके, काळा पैसा, महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्राच्या जीएसटीचा परतावा न देणारे, भ्रष्टाचार या दहा तोंडी रावणाचे दहन करण्यात आले.


मिस्किन मळा, गंगा उद्यान येथे झालेल्या महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, अ‍ॅड. रविंद्र शितोळे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, युवती सेलच्या अंजली आव्हाड, सुमित कुलकर्णी, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, सिध्दार्थ आढाव, क्रीडा सेलचे घनश्याम सानप, निलेश इंगळे, अर्जुन चव्हाण, संजय दिवटे, अक्षय बोरुडे, निखील खामकर, गौरव बोरुडे, संतोष हजारे, शेखर भिसे, अमोल बळे, मिनीनाथ दळवी, विशाल बेलपवार, दिपक वाघ, केतन ढवण, मयुर रोहोकले, रोहन देशपांडे, सुनिता गुगळे, सुजाता दिवटे, सुप्रिया काळे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रमुख प्रश्‍न असलेल्या दशमुखी रावणाचा दहन करण्यात आला आहे. विजयादशमी म्हणजे वाईटाचा नाश होऊन, दुःखांचा विनाश होण्यासाठी व उमेदीची आस जपण्याचा सण आहे. राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक महाराष्ट्रद्रोही आजच्या रावणाचे दहन करण्यात आले आहे. गद्दारी करून सत्तेवर आलेल्या सरकारला आगामी निवडणुकांमध्ये जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर म्हणाले की, महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटी न देणार्‍या, महागाई करून सर्वसामान्यांचे हाल करणार्‍या, काळ्या पैशास उत्तेजन देणार्‍या, वेदांतासारखे महाराष्ट्राचे हक्काचे प्रकल्प गुजरातमध्ये पळवून नेणार्‍या, बेरोजगारी निर्माण करणार्‍या, महिला सुरक्षेबाबत असंवेदनशील असणार्‍या, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणार्‍या, इंधन दरवाढ करून सामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडणार्‍या शेतकर्‍यांच्या महत्वाच्या विषयांबाबत असंवेदनशील असणार्‍या आणि भ्रष्टाचारास चालना देणार्‍या महाराष्ट्रविरोधी रावणाचे दहन करण्यात आले आहे.जेणेकरून शेतक-यांच्या समृध्दीचे, महिला सुरक्षिततेचे, युवकांच्या भल्याचे, कामगारांच्या कल्याणाचे व उज्ज्वल महाराष्ट्राच्या हिताचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *