• Sat. Mar 15th, 2025

शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत युवकांच्या प्रश्‍नांवर एकजुटीने काम करण्याचा निर्धार

ByMirror

Sep 27, 2022

युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थिती

युवकांना जोडून त्यांचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबध्द -इंजि. केतन क्षीरसागर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारींंची आढावा बैठक पार पडली. यामध्ये युवकांच्या प्रश्‍नांवर एकजुटीने काम करण्याचा सर्व पदाधिकार्‍यांनी निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व सर्व सेलचे विभाग प्रमुख उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते उपस्थित होते. प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी यांनी केले. नुकतेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नियुक्त झालेले इंजिनियर केतन क्षीरसागर यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.


आमदार संग्राम जगताप यांनी सर्व युवक पदाधिकारी व सेलच्या विभाग प्रमुखांना एकजुटीने काम करण्याच्या सूचना केल्या. प्रा. माणिक विधाते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन काम केले जात आहे. युवकांच्या प्रश्‍नावर त्यांनी मार्गदर्शन करुन युवकांना संघटित करुन पक्ष वाढविण्याचे सांगितले.


राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या सर्व युवकांना बरोबर घेऊन कार्य केले जाणार आहे. शहरातील सर्व पदाधिकारी आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिनिधी म्हणून कम करीत आहे. या गोष्टीचे भान ठेऊन प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळावी. युवकांना जोडून त्यांचे प्रश्‍न सोडविण्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच स्वतंत्र्यपणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली असून, दर महिन्याला ही बैठक घेतली जाणार आहे. तर शहरात रोजगार वाढविण्याचे दृष्टीकोनाने काम केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच लवकरच युवकांसाठी वाचनालय उभे केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.


या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, अमित खामकर, रेश्मा आठरे, वैभव ढाकणे, साहेबान जहागीरदार, जॉय लोखंडे, डॉ. रणजित सत्रे, साधना बोरुडे, अंजली आव्हाड, योगेश नेमाने, महेश बुचडे, रोहित शिंदे, राजेश भालेराव, ज्ञानेश्‍वर कापडे, भरत गारुडकर, संजय सपकाळ, संतोष ढाकणे, घनश्याम सानप, नितीन लिगडे, अनंतराव गारदे, श्रेणिक शिंगवी, धीरज उकिर्डे, विशाल शिंदे, ऋषीकेश ताठे, सारंग पंधाडे, किरण पंधाडे, सागर गुंजाळ आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते. सारंग पंधाडे यांनी आभार मानून मैत्री गीताने बैठकीचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *