महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र प्रमाणिकपणे मिळाल्याचा गडाख कुटुंबीयांन सुखद धक्का
डॉ. गिर्हे यांनी दाखवलेला प्रमाणिकपणा व सेवाभाव कौतुकास्पद -अॅड. महेश शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण महामार्गावर सापडलेली महत्त्वाच्या शैक्षणिक मुळ कागदपत्रांची पिशवी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष गिर्हे यांनी विद्यार्थ्याच्या वडिलांकडे सुपुर्द केली. महाविद्यालयीन प्रवेश तोंडावर असताना हरवलेली शैक्षणिक मुळ कागदपत्रांची पिशवीने चिंतीत झालेल्या नेप्ती येथील गडाख कुटुंबीयांना प्रमाणिकपणाचा सुखद धक्का बसला. तर सदरची कागदपत्रे मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर समाधान दिसत होते.
डॉ. संतोष गिर्हे उमंग फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे. नुकतेच त्यांना शहरात येताना नगर-कल्याण महामार्गावर रस्त्याच्या कडेला पिशवी पडलेली दिसली. त्यांनी ती उचलून तपासून पाहिली असता, त्यामध्ये एका विद्यार्थ्याचे महाविद्यालयीन प्रवेशासाठी असलेले शैक्षणिक मुळ कागदपत्र, जातीचा, शाळा सोडल्याचा व उत्पन्नाचा दाखला दिसला. दाखल्यावर असलेल्या एका नंबरवर त्यांनी फोन केला असता, ते नेप्ती येथील विजय जयवंता गडाख यांच्या मुलाची पिशवी असल्याचे समजले. हरवलेली पिशवी मिळाल्याचे समजल्याने गडाख कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
डॉ. गिर्हे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे पो. कॉ. अनिल राजाराम हराळ यांना बोलावून त्यांच्या समक्ष विजय गडाख यांच्याकडे शैक्षणिक मुळ कागदपत्रांची पिशवी सुपुर्द केली. यावेळी चाँद शेख वल्लीमोहम्मद, जय असोसीएशन ऑफ एनजीओचे अॅड. महेश शिंदे, वैशाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अॅड. महेश शिंदे यांनी डॉ. गिर्हे यांनी दाखवलेला प्रमाणिकपणा व सेवाभाव कौतुकास्पद आहे. अनेक लहान-मोठ्या सापडलेल्या गोष्टी इतरांसाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. हरवलेली वस्तू पुन्हा मिळाल्यास त्याचे मोल व आनंद अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. संतोष गिर्हे यांनी ज्याची वस्तू त्याला परत मिळण्यासाठी सेवाभावाने योगदान देऊन त्यांच्या पर्यंत पोहच केल्याचे सांगितले.