• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

मोहरम उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या पोलीस दलाचा सन्मान

ByMirror

Jun 30, 2026
मोहरम उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या पोलीस दलाचा सन्मान

हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने पोलीस अधिकारी व पोलीसांचा गौरव; सलग 22 तास अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांच्या कार्याला सलाम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक मोहरम उत्सव यंदा शांततेत आणि अत्यंत उत्साहात पार पडला. उत्सवादरम्यान सलग 22 तास अहोरात्र कर्तव्य बजावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हाजी हमीद तकिया ट्रस्ट’च्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यात माननीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, पोलीस उपअधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर उपअधीक्षक दिलीप टिपरसे, तसेच तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हाजी हमीद तकिया ट्रस्टचे सय्यद साबिर अली, ‘स्नेहलय’चे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, रोहित मिस्किन, ‘स्नेहलय इंग्लिश स्कूल’च्या मानद संचालिका श्रीमती कांचन पापडेजा यांनी पोलीस अधिकारी व पोलीसांचा सत्कार केला.


या कार्यक्रमाप्रसंगी स्टचे विश्‍वस्त अली सय्यद, सय्यद गालिब अली, सय्यद मोहम्मद अली, सय्यद राहबर अली, सय्यद रजा, सय्यद बिलाल, सय्यद शहा, सय्यद उवेज, रेहान शेख, अबूबकर शेख, ॲड. अनिकेत राठोड, राहुल चिंतामणी, मुस्तकीम भाई, फरान शेख, रेहान शेख, फरीद शेख तसेच ट्रस्टचे इतर विश्‍वस्त आणि मान्यवर उपस्थित होते.
स्टच्या वतीने मोहरम उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजन, सतर्कता आणि समर्पित सेवाभावाचे कौतुक करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमातून सामाजिक सलोखा, परस्पर विश्‍वास आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देखील मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले.


जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी पोलीस दलाच्या वतीने युवक-युवतींसाठी महाविद्यालयीनस्तरावर व्यसनमुक्तीचा उपक्रम घेतला जाणार असल्याची माहिती दिली. सय्यद साबिर अली यांनी हाजी हमीद तकिया ट्रस्ट व गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालय परिवार या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *