शहरात उत्साहात स्वागत
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील यासीन तांबोळी या युवकाने अवघ्या 20 व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती होण्याचा मान मिळवला आहे. देशसेवेचे स्वप्न साकार करत सैन्यात निवड झाल्यानंतर शहरात त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कुटुंबीय, नातेवाईक यांनी फुलांची उधळण करत वाजत-गाजत त्याचे अभिनंदन केले. यासीनच्या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, तरुणांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे.

