• Thu. Jun 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘जिंदगी प्यार का गीत है’ कार्यक्रमात लकी ड्रॉची रंगत; अशोक पराते यांना पैठणी साडीचे बक्षीस

ByMirror

Jun 18, 2026
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्याचा सन्मान

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्याचा सन्मान


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज (आमी) आणि श्री पूजा इव्हेंट्‌स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जिंदगी प्यार का गीत है’ या बहारदार ऑर्केस्ट्रा म्युझिकल धमाल कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संगीत, मनोरंजन आणि विविध आकर्षक उपक्रमांनी सजलेल्या या कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ सोडतीने विशेष रंगत आणली.


कार्यक्रमादरम्यान काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य अशोक पराते हे भाग्यवान विजेते ठरले. सोडतीद्वारे त्यांना आकर्षक पैठणी साडीचे बक्षीस प्रदान करण्यात आले. बक्षीस जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. सत्कार प्रसंगी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, ताराचंद ठोकळ, संजय भिंगारदिवे, जालिंदर अळकुटे, अविनाश जाधव, नवनाथ वेताळ, शिवांग शिंदे, ज्योतीताई भिंगारदिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी अशोक पराते यांचे अभिनंदन केले.


‘जिंदगी प्यार का गीत है’ या संगीत मैफलीने जुन्या-नव्या गाण्यांचा सुरेल संगम घडवत रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमातील कलाकारांच्या दमदार सादरीकरणामुळे उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला. त्यातच लकी ड्रॉच्या उपक्रमामुळे कार्यक्रमात रंगत आनली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *