• Tue. Jan 27th, 2026

प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय सोहळ्यात मुलींच्या आर.एस.पी. पथकाचे शिस्तबद्ध संचलन

ByMirror

Jan 27, 2026

श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मानवंदनेतून वेधले उपस्थितांचे लक्ष


पालकमंत्री विखे यांच्यासह मान्यवरांना दिली सलामी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीराम माध्यमिक विद्यालय, देवगाव (ता. नेवासा) येथील विद्यार्थिनींच्या आर.एस.पी. पथकाने अत्यंत शिस्तबद्ध व उत्कृष्ट संचलन सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या संचलनासोबत सहभागी होत या विद्यालयाच्या आर.एस.पी. पथकाने मान्यवर पाहुण्यांना संचलनाद्वारे मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या शिस्तप्रिय व तालबद्ध संचलनाने सर्वच मान्यवर प्रभावित झाले. या कार्यक्रमास माध्यमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड व प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी श्री दातीर, शहर वाहतुक शाखेचे पो.नि. बाबासाहेब बोरस्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी केले.
आर.एस.पी. पथकात लीडर मिज्बा आजादखान पठाण व मार्कर नंदिनी नंदू काळे यांच्यासह अश्‍मिरा लाला पटेल, वैष्णवी बोके, अक्षरा निकम, अलिषा काळे, सांची गायकवाड, किरण काळे, अक्षदा जाधव, अनुष्का गायकवाड, स्तुती काळे, आनंदी पाडळे, आयेशा सय्यद, साक्षी तागड, रुक्सार शेख, प्रियंका शेलार, आरुषी काळे, साक्षी एडके, सुमित्रा भिसे, सुवर्णा नागरे, ईश्‍वरी वाल्हेकर, दीक्षा काळे व अलमास शेख या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सर्व विद्यार्थिनींनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले.
हे संचलन आर.एस.पी. अधिकारी सिकंदर शेख, डी.आय. शाहनवाज शेख, पो. मुस्ताक शेख, पो. नितीन मोरे, आप्पासाहेब घिगे, खलिल शेख व मंगेश दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. आर.एस.पी. पथक व मार्गदर्शक यांचे मा.आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, माजी सभापती डॉ. क्षितीज घुले पाटील. संस्थेचे प्र. अधिकारी के.वाय. नजन, समन्वयक विजय काशिद, स्कूल कमेटी अध्यक्ष करदास गुंदेचा, मा. सरपंच गोरक्षनाथ निकम, कदिर खान, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, मुख्याध्यापक सोपान सरतरकर यांनी अभिनंदन केले.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *