गावात विद्यार्थ्यांनी केला सार्वजनिक स्वच्छतेचा जागर
देशभक्तीच्या गीतांचे बहारदार सादरीकरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे 77 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हातात तिरगे झेंडे घेवून भारत माता की जय घोषात गावात प्रभातफेरी काढली. या फेरीद्वारे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा जागर केला. प्रभात फेरीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थांची मने जिंकली. यावेळी महाराष्ट्राची लावणी, लेझीम पथक व देशभक्तीच्या गीतांचे बहारदार सादरीकरण झाले.
सकाळी गावात नवनाथ विद्यालय, शहीद स्मारक (गोरख नाना जाधव), ग्रामपंचायत कार्यालय व जि.प. प्राथमिक शाळेत अनुक्रमे सेवानिवृत्त मेजर राजेंद्र फलके, किसन गहिले, उपसरपंच किरण जाधव व सरपंच उज्वलाताई कापसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणा नंतर गावात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. तसेच संविधानाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. ग्रामपंचायतमध्ये सरपंच उज्वलाताई कापसे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ नारी शक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ, सागर कापसे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, मंदा साळवे, ग्रामपंचायत सदस्य संजय कापसे, दिपक गायकवाड, प्रमोद जाधव, उद्योजक अरुण फलके, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, सेवानिवृत्त मेजर कैलास जाधव, मुख्याध्यापिका शांता नरवडे, गोरख फलके, ज्ञानदेव कापसे, चंद्रकांत पवार, अजय ठाणगे, रामदास कदम, संपत कापसे, अरुण कापसे, मयुर काळे, उद्योजक जालिंदर जाधव, बाळू बोडखे, जयराम जाधव, संजय डोंगरे, आप्पासाहेब कदम, दिपक जाधव, शिवाजी पुंड आदींसह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
