• Tue. Jan 20th, 2026

महायुतीच्या 52 विजयी नगरसेवकांचा घरोघरी व प्रभागात जाऊन सत्कार

ByMirror

Jan 20, 2026

महापालिका निवडणुकीत विकासात्मक विचारांचा विजय झाला -प्रा. माणिक विधाते

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व भारतीय जनता पक्षाच्या सर्व 52 विजयी नगरसेवकांचा शहर सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी गौरव केला. हा सत्कार सोहळा आमदार संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.


विशेष म्हणजे, हा सत्कार कार्यक्रम केवळ एका ठिकाणी मर्यादित न राहता नगरसेवकांच्या घरोघरी तसेच त्यांच्या प्रभागात जाऊन आयोजित करण्यात आला होता. कार्यकर्ते, नागरिक आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.


या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित विजयी नगरसेवक संपत विजय बारस्कर, डॉ. सागर अर्जुन बोरुडे, दिपाली नितीन बारस्कर, महेश रघुनाथ तवले, संध्या बाळासाहेब पवार, गौरी अजिंक्य बोरकर, ज्योती अमोल गाडे, काजल गोरख भोसले, हरप्रीतकौर जगजीतसिंग गंभीर, मोहित प्रदीप पंजाबी, सुनिता किसन भिंगारदिवे, कुमार बबन वाकळे, आशा किशोर डागवाले, सुरेश लक्ष्मण बनसोडे, सुजाता महेंद्र पडोळे, अनिता विपुल शेटीया, अविनाश हरिभाऊ घुले, प्रकाश बाबुराव भागानगरे, सुनिता भगवान फुलसौंदर, मीना संजय चोपडा, गणेश पुंडलिक भोसले, पोर्णिमा विजय गव्हाळे, गीतांजली सुनिल काळे, सुनिता महेंद्र कांबळे, वर्षा सुजित काकडे, मयूर कन्हैयालाल बांगरे, आश्‍विनी सुमित लोंढे यांच्यासह भाजपचे विजयी नगरसेवक सुजय अनिल मोहिते, शारदा दिगंबर ढवण, रोशनी प्रवीण भोसले-त्र्यंबके, निखिल बाबासाहेब वारे, ऋग्वेद महेंद्र गंधे, धनंजय कृष्णा जाधव, मनोज लक्ष्मण दुल्लम, सोन्याबापू तायगा शिंदे, सुनिता श्रीकृष्ण कुलकर्णी, करण उदय कराळे, वर्षा रोहन सानप, पुष्पाताई अनिल बोरुडे, वंदना विलास ताठे, बाबासाहेब सोन्याबापू वाकळे, आशाबाई लोभाजी कातोरे, महेश राम लोंढे, शीतल अजय ढोणे, मयुरी सुशांत जाधव, सागर राजू मुर्तडकर, सुभाष सोपानराव लोंढे, दत्तात्रय सोमनाथ गाडळकर, विजय मोहन पठारे, ज्ञानेश्‍वर शिवाजी येवले, कमल जालिंदर कोतकर व मनोज शंकर कोतकर यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.


सत्कारप्रसंगी बोलताना प्रा. माणिक विधाते म्हणाले की, “या महापालिका निवडणुकीत केवळ राजकीय बदल नव्हे, तर विकासात्मक विचारांचा विजय झाला आहे. अहिल्यानगरच्या नागरिकांनी विकासाला स्पष्ट पसंती दिली असून, त्यामुळेच महायुतीला एकहाती सत्ता दिली आहे. विकासात्मक नेतृत्वावर जनतेने विश्‍वास दाखवला आहे.


आज महापालिकेत अनेक नवोदित, अभ्यासू व अनुभवी चेहरे निवडून आले आहेत. ही केवळ पदांची जबाबदारी नसून, शहराच्या भविष्याची जबाबदारी आहे. आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरचा विकास अधिक वेगाने होत आहे. या निकालाने त्या विकासाला आणखी बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. ही विकासाची घोडदौड थांबणार नाही, तर अखंडपणे सुरू राहील, असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *