• Mon. Jan 12th, 2026

भाजपच्या शहरजिल्हा सचिवपदी संदिप पवार यांची नियुक्ती

ByMirror

Jan 11, 2026

एकनिष्ठ राजकीय कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर शहरजिल्हा सचिवपदी संदिप पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी ही नियुक्ती जाहीर करून पवार यांना नियुक्तीपत्र दिले.
संदिप पवार हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते असून गेल्या 15 वर्षांपासून ते भाजपमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर जबाबदारीने काम केले आहे. यापूर्वी त्यांनी शहरजिल्हा उपाध्यक्ष या पदावर प्रभावीपणे कार्य करत पक्षकार्याला गती दिली होती.


पवार हे आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी अनेक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांसाठी मदतीचे कार्य, विविध सामाजिक उपक्रम, तसेच युवकांना संघटित करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा राखत समाजसेवा, संघटन वाढ आणि पक्षबांधणी या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संघटनात्मक कामकाजात त्यांची असलेली कार्यक्षमता, सातत्यपूर्ण पक्षनिष्ठा आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांची शहरजिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.


या नियुक्तीबद्दल विनायक देशमुख, ॲड. धनंजय जाधव, सुवेंद्र गांधी, महेंद्र भैय्या गंधे, प्रकाश थोरात, सुभाष आल्हाट यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संदिप पवार यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *