हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून सत्कार
छावणी परिषदेच्या शाळा भौतिक सुविधांसह आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षण, मूल्याधिष्ठित संस्काराने पुढे जात आहेत -पल्लवी विजयवंशी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीएम श्री योजनेअंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता, सहशालेय उपक्रम, अद्ययावत भौतिक सुविधा व विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीद्वारे छावणी परिषद अहिल्यानगर अंतर्गत शाळांचा सर्वांगीण कायापालट केल्याबद्दल महानिदेशक रक्षासंपदा विभाग, नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘रक्षामंत्री पुरस्कार’ छावणी परिषद अहिल्यानगर यांना प्राप्त झाला आहे. या गौरवाबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमात छावणी परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी, छावणी परिषद शाळांचे मुख्याध्यापक संजय शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले व मुख्याध्यापिका मुबिना सय्यद यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सैन्यदलात भरती झाल्याबद्दल शिवतेज देविदास गंडाळ तसेच आर्मड कोअर सेंटर येथे इंजिनिअर सेक्शन हेड पदी नियुक्त झालेले संतोष मधुकरराव ससे यांचा देखील सन्मान करून राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या सन्मान सोहळ्यासाठी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अभिजीत सपकाळ, दिलीपराव ठोकळ, दिपकराव धाडगे, मनोहर दरवडे, दिनेश शहापूरकर, दिलीप गुगळे, संजय भिंगारदिवे, अविनाश जाधव, सुधीर कपाळे, दीपक घोडके, प्रांजली सपकाळ, सुरेखा आमले, गुरुद्याल कौर मिनहास, विद्याताई सोनवणे, कविता भिंगारदिवे, सुवर्णा महागडे-भिंगारदिवे, संगीता सपकाळ, कांताबाई नरवाला, दीपक मेहतानी, रतनशेठ मेहेत्रे, अशोकराव पराते, विलास आहेर, शशांक अंबावडे, परेश मेवानी, अनंत सदलापूरकर, मुन्ना वाघस्कर, कुमार धतुरे, मुकेश मुथियान, संतोष ससे, देविदास गंडाळ, इंजि. नागेश खुरपे आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी आयोजित हास्य योग सत्रात मुख्यकार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी स्वतः सहभागी झाल्या. त्यांनी उपस्थितांसोबत योगाभ्यास करत निरोगी शरीर, सकारात्मक मन व शिस्तबद्ध जीवनशैलीचा कानमंत्र दिला. पल्लवी विजयवंशी म्हणाल्या की, छावणी परिषद शाळांना मिळालेला रक्षामंत्री पुरस्कार हा एका व्यक्तीचा नव्हे, तर शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा गौरव आहे. आमच्या शाळा केवळ भौतिक सुविधांनी सज्ज नाहीत, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण, मूल्याधिष्ठित संस्कार व आधुनिक शिक्षणपद्धतींनी पुढे जात आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील मुले येथे शिक्षण घेत असून, त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की, छावणी परिषद अहिल्यानगरला राष्ट्रीय पातळीवरील रक्षामंत्री पुरस्कार मिळणे हे संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद आहे. शिक्षण क्षेत्रात होत असलेले सकारात्मक बदल समाजाच्या प्रगतीची दिशा ठरवतात. हरदिन मॉर्निंग ग्रुप समाजोपयोगी, प्रेरणादायी कार्यांचा नेहमीच गौरव करत आला आहे. तर दुर्लक्षीत व उपेक्षित घटकांच्या शिक्षणासाठी ग्रुपच्या माध्यमातून हातभार देखील लावला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सचिन चोपडा म्हणाले की, शिक्षण, छावणी परिषद शाळांमधून घडणारी विद्यार्थी पिढी उद्याचे सक्षम नागरिक घडणार आहे. शिक्षणातून समाजाची प्रगती शक्य आहे. यासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सज्ज झालेल्या छावणी परिषदेच्या शाळा सर्वांसाठी अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील हळगावकर, सुहासराव सोनवणे, राजू कांबळे, रामनाथ गर्जे, विनय महाजन, शिवकुमार पांचारिया, तुषार घाडगे, योगेश हळगावकर, सखाराम अळकुटे, दीपक अमृत, प्रसाद भिंगारदिवे, विनोद खोत, प्रशांत भिंगारदिवे, विशाल भामरे, वंश नरवाला, गोकुळ भांगे, अनिल शिरसाठ, शब्बीर शेख, गवारे मेजर आदींनी परिश्रम घेतले.
