3 वर्षांच्या चिमुकलीने अवघ्या 32 सेकंदांत सांगितली भारतातील 28 राज्यांची राजधानी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हुशारी आणि स्मरणशक्ती जोरावर संगमनेरची चिमुकली अर्णवी आनंद हासे हिने अवघ्या 3 वर्षे 4 महिन्यांच्या वयात 32 सेकंदांत भारतातील 28 राज्ये व त्यांच्या राजधानीचे अचूक उच्चारण करून एक अभूतपूर्व विक्रम रचला आहे. या अद्वितीय कामगिरीबद्दल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तिच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.
संगमनेरच्या या बाल प्रतिभेने जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. अर्णवीच्या या यशानंतर तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. बालवयात एवढी उत्कृष्ट स्मरणशक्ती दाखवून अर्णवीने इतर लहान मुलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
अर्णवीने एकाच श्वासात राज्यांची नावे आणि राजधानी अचूक सांगत प्रेक्षकांना थक्क केले. एवढ्या कमी वेळात केलेली ही कामगिरी तिला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून देणारी ठरली आहे. अर्णवीच्या या यशाबद्दल तिच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. बोलताना तीचे वडिल आनंद हासे म्हणाले कि,ती लहानपणापासूनच खूप निरीक्षक स्वभावाची आहे. अभ्यास आणि स्मरणशक्तीची आवड असल्याने तिने हा विक्रम सहज साध्य केला. भविष्यात ती आणखी मोठ्या उंचीवर झेप घेईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे ते म्हणाले. अर्णवीचे आजोबा किसन हासे, आज्जी सुशिला हासे, आई पूजा हासे, काका सुदीप हासे, प्रियंका हासे, आशा जमदाडे, कैलास जमदाडे, रुचिता जमदाडे व मामा प्रसाद जमदाडे यांनी तीचे विशेष कौतुक केले.