शहरातून होणार थेट अजमेरला रवानगी
सात दिवसीय यात्रेचे भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या दर्शन यात्रेचे शहरातून आयोजन करण्यात आले आहे. अजमेर (राजस्थान) ला जाण्यासाठी शहरातून कौटुंबिक धार्मिक यात्रेची संधी भाविकांना उपलब्ध होणार असून, हे 7 दिवसीय यात्रेचे नियोजन करण्यात आली असल्याची माहिती यात्रेचे समन्वयक फजल शेख यांनी दिली आहे.
शहरातून थेट अजमेरला जाण्यासाठी रेल्वे अथवा खासगी वाहनांची पुरेशी सुविधा नसल्याने शहरातून विशेष खासगी लक्झरी (स्लिपर) बसने जाण्याची सोय करण्यात आलेली आहे. 20 ऑक्टोबर रोजी ही दर्शन यात्रा शहरातून निघणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या यात्रेत अजमेर शरीफ, शरवाड शरीफ, टाटोटी शरीफ, कपासन शरीफ, चितोड गड, जावरा, चाळीस गाव, धुलिया येथील धार्मिक स्थळांना भेट दिली जाणार आहे. या यात्रेत भाविकांची नाश्ता, जेवण, राहण्याची व्यवस्था अल्पखर्चात सेवाभावाने करण्यात आली आहे. या यात्रेत प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य राहणार असल्याने अधिक माहिती व नोंदणीसाठी 8087742818 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.