529 महिलांची तपासणी करुन 50 गरोदर महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन
स्वस्थ नारी, सशक्त परिवार भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या अभियानांतर्गत उपक्रम
समाजातील सुमारे 50 टक्के महिला रक्तक्षयामुळे त्रस्त -डॉ. भास्कर रणनवरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत तपोवन रोड, सावेडी येथील हिम्मतनगर परिसरात मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. समाज परिवर्तन संस्था, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, युवक कल्याण योजना, महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 529 महिलांची तपासणी या शिबिरात करण्यात आली. विशेष म्हणजे, 50 गरोदर महिलांची विशेष तपासणी करुन त्यांना सल्ला सुद्धा देण्यात आला तर सुमारे 17क्षयरोगाची चाचणी एक्स-रेसुद्धा घेण्यात आली. सुमारे 70 रुग्णांचे रक्ताचे नमुने विविध तपासणीसाठी घेण्यात आले
या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका रूपालीताई वारे, संध्याताई पवार आणि माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या हस्ते झाले.स्त्रीरोग तज्ञ डॉ. भास्कर रणनवरे स्री रोग तज्ञ,आनंद हॉस्पिटल पाईपलाईन रोड व समाज परिवर्तन संस्था यांनी महिलांची तपासणी करून मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजातील सुमारे 50 टक्के महिला रक्तक्षयामुळे (ॲनिमिया) त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. महिलांचे आरोग्य बिघडले तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येते. साध्या आहारात पालक, बीट, तांदूळ यांचा समावेश करून तसेच नियमित तपासणी व रक्तवाढीच्या गोळ्या घेतल्यास गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकणार असल्याचे ते म्हणाले.
माजी नगरसेविका संध्याताई पवार म्हणाल्या की, कुटुंबाची काळजी घेताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. रूपालीताई वारे यांनीही महिलांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले.
या शिबिरात महानगरपालिकेच्या डॉ. डॉक्टर कांचन रच्चा मॅडम, डॉ. आशिष इंगळे, डॉ. वृषाली आरु, डॉ. रजत येवले, डॉ. अदिती पाटोळे, डॉ. फातिमा शेख, डॉ. ऋतुजा रणदिवे, डॉ. शुभम गाडे, तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉ. राहुल पवार, डॉ. वैशाली बोठे, डॉ. विनय शेळके व इतर सर्व सिविल मधील स्टाफ आदी डॉक्टरांनी महिलांसह नागरिकांची तपासणी केली. सिस्टर्स कविता खिलारे, म्हस्के, मनीषा साठे, वैशालीआंदळकर, स्वाती कांबळे, सुनिता चौधरी, सरला खाटीक, मिनाक्षी मोरे तसेच दिलीप आंधळे, अमोल पागीरे, एक्स-रे विभागाचे तन्वीर शेख, दिलीप दुधाडे, आशाताई यांचे शिबिरात सहकार्य लाभले.
प्रास्ताविक डॉ. अदिती पाटोळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पिंपळे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. डॉ. रजत येवले यांनी मानले. या आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत पाठक, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, युवक कल्याण योजना अधिकारी सत्यजित संतोष यांचे विशेष सहकार्य लाभले.