• Tue. Oct 14th, 2025

जीएसटी कपातीमुळे ईलाक्षी ह्युंदाईत कार विक्रीचा पाऊस

ByMirror

Sep 28, 2025

ग्राहकांची गर्दी; कार झाली सर्वसामान्यांच्या अवाक्यात


नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 100 वाहनांची विक्री; क्रेटा, अल्काजर, एक्सटर अग्रस्थानी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने सप्टेंबर 2025 मध्ये वाहनावरील जीएसटी मध्ये कपात जाहीर केल्यानंतर कारच्या किंमतीत ग्राहकांना मोठी सवलत मिळाली आहे. ह्युंदाई मोटार्सने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत मोठी घट जाहीर केली असून, त्याचा सर्वाधिक फायदा थेट ग्राहकांना होत आहे. नगरमधील ईलाक्षी ह्युंदाई शोरूममध्ये देखील याचा फायदा ग्राहकांना मिळण्यास सुरुवात झाली आहे.


नगर-पुणे रोडवरील ईलाक्षी ह्युंदाई शोरूममध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. ईलाक्षी ह्युंदाईने यावर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच 100 पेक्षा अधिक वाहनांची विक्री केली. हा विक्रम गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक विक्रीचा टप्पा मानला जात आहे. सणासुदीच्या काळात वाहन खरेदीला विशेष महत्त्व असते. यंदा जीएसटी कपातीमुळे विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचे शोरूमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


ह्युंदाईच्या विक्रीत एसयूव्ही मॉडेल्सचा मोठा वाटा आहे. विशेषतः क्रेटा, अल्काजर आणि एक्सटर या गाड्यांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. कंपनीने जीएसटी 2.0 नुसार किंमतीत कपात करण्यात आली असल्याची माहिती शोरूमचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवर यांनी दिली.


यामुळे ह्युंदाईचे सर्व कारचे मॉडेल्स सर्वाधिक परवडणारे बनले आहे. क्रेटा स्टँडर्ड (72,145 रुपये कपात), क्रेटा लाइन ( 71,762 रुपये कपात), अल्काजर एसयूव्ही सर्व व्हेरियंट (75,376 रुपये कपात), कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यू (1,23,659 रुपये पर्यंत स्वस्त), आय 20 व एक्सटर (98,000 रुपये कपात), ग्रँड आय 10 निओस व ऑरा (अनुक्रमे 73,000 व 78,000 रुपयांनी स्वस्त) याप्रमाणे किंमतीत मोठ्या प्रमाणात सुट मिळाली आहे.


शोरूम संचालक विजयकुमार गडाख यांच्या सहकार्यामुळे विक्री वाढीस मोठा हातभार लागल्याचे बेजगमवर यांनी नमूद केले.


आगामी दसरा व दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी आपल्या घरातील कार (लक्ष्मी) ईलाक्षी ह्युंदाई मधूनच खरेदी करावी, ग्राहकांनी आपल्या पसंतीची गाडी लवकरात लवकर बुक करावी असे आवाहन करण्यात आले आहे. विक्रीपश्‍चात सेवेतही ईलाक्षी ह्युंदाई नेहमीच कटिबद्ध राहील, असे सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *