• Fri. Aug 29th, 2025

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी

ByMirror

Aug 28, 2025

हायब्रीड वाहनांना मागणी

नगर (प्रतिनिधी)- गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शहरातील चारचाकी वाहन खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणेशोत्सवाचा मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेतली व काहींनी या उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बुकींग केली. केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.


गणेश चतुर्थीला तब्बल 18 चारचाकी वाहनांचे ग्राहकांना वितरण करण्यात आले. गाडीची विधीवत पूजा करुन, दिवसभर वाहन वितरणाचा कार्यक्रम सुरु होता. संपूर्ण कुटुंबीयांसह वाहन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांमुळे शोरुमचा परिसर गजबजला होता. वासन ग्रुपचे प्रमुख विजय वासन व तरुण वासन यांनी गणेश चतुर्थीच्या ग्राहकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा आदींसह शोरुम मधील सेल्स टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते.


कार उत्पादन क्षेत्रात जगातील टॉप ब्रॅण्ड असलेल्या टोयोटा कंपनीत प्रवाश्‍यांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देवून कारची निर्मिती करण्यात येते. क्वॉलिटी, ड्युरॅब्लिटी, रिलॅब्लिटी (क्युडीआर) या संकल्पनेवर आधारित निर्मिती केलेल्या व आकर्षक लूक, दणकटपणा व 6 लाख 99 हजार पासून उपलब्ध होत असलेल्या टोयॅटोच्या वाहनांना ग्राहकांची मागणी आहे. मोठ्या वाहनात फॉर्च्यूनर व सिटी व्हिकल म्हणून हचबॅक ग्लांजा, बी सेगमेंट एसयूव्ही टायझर, एमपीव्ही रुमीअन सेव्हन सीटर मॉडेलला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. तर बॅटरी व पेट्रोलचा संयुक्त समावेश असलेली स्मार्ट हायब्रीड हायरायडर वाहनाला देखील अधिक मागणी असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली. शोरुमला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थिती लावून वाहनांचे वितरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *