भाविकांना फराळचे वाटप करुन मंदिरत परिसरात स्वच्छता अभियान
सर्व धर्म, अध्यात्म आणि संस्कृती हे निसर्गाशी निगडित -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धन व आरोग्य चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त बेलेश्वर मंदिरात बेलाच्या रोपाची लागवड करुन मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर भाविकांना उपवासासाठी खिचडी आणि फळांचे वाटप करण्यात आले.

भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर व नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या हस्ते फराळ वाटप उपक्रमाला प्रारंभ झाला. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेशराव वराडे, जहीर सय्यद, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, दिलीपराव ठोकळ, अभिजीत सपकाळ, रतनशेठ मेहेत्रे, चंद्रकला येलुलकर, मनीषा शिंदे, उषाताई ठोकळ, प्रांजली सपकाळ, प्रियांका शिंदे, प्रमिला गायकवाड, दीपकराव धाडगे, मनोहर दरवडे, सुधीर कापाळे, कोंडीराम वाघस्कर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, जालिंदर बेल्हेकर, सुभाषशेठ नबरीया, अशोक लोंढे, सुनील जाधव, अविनाश जाधव, अविनाश पोतदार, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, दलीपशेठ गुगळे, इंजि. नागेश खुरपे, संतोष चोपडा, गणेश अस्मर, शहर बँकेचे संचालक शिवाजीराजे कदम, सुंदरराव पाटील आदींसह ग्रुपचे सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुप पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागृती आणि धार्मिक कार्य एकत्रितपणे राबवत असल्याबद्दल कौतुक केले. ग्रुपचे सामाजिक व धार्मिक कार्य दिशादर्शक असल्याची भावना हाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी व्यक्त केली.
संजय सपकाळ म्हणाले की, सर्व धर्म, अध्यात्म आणि संस्कृती हे निसर्गाशी निगडित आहेत. निसर्ग हा देवाचा साक्षात रूप आहे. आज आपणच या दैवी निसर्गाचा ऱ्हास करून स्वतःच्या अस्तित्वालाच धोका निर्माण केला आहे. पुर, दुष्काळ, तापमानवाढ ही केवळ नैसर्गिक घटना नसून, मानवी चुकीची फलश्रुती आहे. धार्मिक स्थळांवर वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमा राबविणे हे केवळ सेवा नसून ती आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपने प्रत्येक सण, उत्सव, वाढदिवसाला वृक्षारोपणाची जोड देण्याचा संकल्प केला आहे. आज बेलाच्या रोपाची लागवड ही केवळ धार्मिक परंपरेची जोपासना नाही, तर पर्यावरण व मानवजातीच्या कल्याणाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन चोपडा यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धनाची राबविण्यात येत असलेल्या चळवळीची माहिती दिली. तर प्रत्येक सण-उत्सव आणि वाढदिवसाला वृक्षारोपणाची जोड देऊन पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बेलेश्वर मंदिरात दर्शनास आलेल्या भाविकांसाठी हरदिनच्या वतीने शाबुदाना खिचडी, वेफर्स, फळ आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.सकाळी 8 वाजता सुरू झालेला हा उपक्रम दुपारपर्यंत भाविकांसाठी सुरू होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिनेश शहापूरकर, सरदारसिंग परदेशी, योगेश चौधरी, दीपकराव घोडके, जालिंदर अळकुटे, किरण फुलारी, राजू कांबळे, दीपकशेठ मेहतानी, नवनाथ वेताळ, संजय भिंगारदिवे, श्रीनिवास राव, कुमार धतुरे, विठ्ठल राहिंज, शशिकांत पवार, प्रकाश देवळालीकर, दशरथराव मुंडे, सखाराम अळकुटे, भरत कनोजिया, दत्तात्रेय लाहुंडे, विकास निमसे आदींनी परिश्रम घेतले.