• Sat. Jul 19th, 2025

अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी नवनाथ घुले

ByMirror

Jul 16, 2025

तर सचिवपदी राजेंद्र बारगुजे यांची नियुक्ती


3 वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी जाहीर

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. राज्य महामंडळाचे अध्यक्ष संजयकुमार निक्रड यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. नवनाथ घुले यांची अध्यक्षपदी तरराजेंद्र बारगुजे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. 2025 ते 2028 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी ही कार्यकारिणी राहणार आहे.


अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या कार्याध्यक्षपदी- विष्णु मगर, उपाध्यक्षपदी- भागवत गायकवाड, बाबासाहेब दौंड, अनिल वाकचौरे, खजिनदारपदी- बाळासाहेब निवडुंगे, हिशोब तपासणीस- सोमनाथ सुंबे, जिल्हा परीक्षा समिती परीक्षा प्रमुखपदी- अविनाश बोंद्रे, परीक्षा समिती सदस्यपदी- संजय रोकडे, दिपक शिंदे, अमोल देशमुख, भास्कर सुवर्णकार, सहसचिवपदी- देविदास सातपुते, भाऊसाहेब इथापे, मयुर परदेशी, प्रसिध्दी प्रमुखपदी- शहाजी मुन्तोडे, विद्या समिती- सचिन कर्डिले, अतुल पटवा, नवनाथ साळवे, सल्लागारपदी- सुनिल पंडीत, कल्याण ठोंबरे, राजेंद्र खेडकर, जालिंदर बलमे, दिलिपकुमार रणसिंग, कार्यकारिणी सदस्यपदी- भरत लहाने, सचिन सिन्नरकर, सुखदेव नागरे, सच्चिदानंद झावरे, राम मगर, भानुदास बांडे, बाबासाहेब मोहीटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


नूतन कार्यकारिणीचा सत्कार राज्य महामंडळाचे अध्यक्ष संजयकुमार निक्रड, जिल्हा संघाचे नूतन अध्यक्ष नवनाथ घुले, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, संचालक बाबासाहेब बोडखे, संचालक महेंद्र हिंगे, राजेंद्र कोतकर, संचालक सुरज घाटविसावे, संचालिका वैशाली दारकुंडे, मंडळाचे सल्लागार प्राचार्य राजेंद्र खेडकर, माजी संचालक कल्याण ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीला जिल्हातील अनेक गणित शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *