• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगार अर्बन बँकेच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सन्मान

ByMirror

Jul 13, 2025
भिंगार अर्बन बँकेच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सन्मान

राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या राज्य अध्यक्षपदी बोरुडे यांची निवड अभिमानास्पद -अनिल झोडगे

नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल भिंगार अर्बन बँकेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.


भिंगार अर्बन बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बँकेचे चेअरमन अनिल झोडगे व व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांनी बोरुडे यांचा सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ संचालक कैलास खरपुडे, आर.डी. मंत्री, एकनाथ जाधव, राजेंद्र पतके, कैलास रासकर, महेश झोडगे, तिलोत्तमा करांडे, सौ. अनिता भुजबळ, कैलास खरपुडे, नामदेव लंगोटे, कैलास दळवी, रुपेश भंडारी, बाळासाहेब गोंधळे, व्यवस्थापक शशीकांत महाजन, सचिन थोरात आदींसह संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चेअरमन अनिल झोडगे म्हणाले की, जालिंदर बोरुडे हे गेल्या 33 वर्षापासून अहिल्यानगरसह महाराष्ट्रात नेत्रदान चळवळ प्रभावीपणे राबवित आहे. फिनिक्सच्या सामाजिक कार्यामुळे नागरदेवळे गावाचे नाव राज्यभरात उंचावले गेले आहे. नेत्र तपासणी शिबिर व नेत्रदान चळवळीला गती देण्याचे काम बोरुडे यांनी केले. राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या राज्य अध्यक्षपदी बोरुडे यांची झालेली निवड अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी हजारो लोकांना नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून नवदृष्टी मिळवून देण्याचे कार्य केले. अंधत्व निवारणासाठी त्यांचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे, ते म्हणाले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *