पोलिसांच्या कामकाजाच्या परीक्षणाची संधी उपलब्ध करुन दिल्याच्या कार्याचे स्वागत
सर्वसामान्यांना पोलीसांबद्दल आपले मत नोंदवता येणार -ॲड. लक्ष्मण पोकळे
नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रथमच पोलिसांच्या कामकाजाच्या परीक्षणाची संधी दिल्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, रमेश कळमकर, राधाकृष्ण आहेर, विवेक आटपाटकर आदी उपस्थित होते.
ॲड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, पोलीस प्रशासनाचे कामकाज कसे चालले आहे. ते योग्य आहे की नाही? त्यासाठी नागरिकांचा अभिप्राय मिळाल्यास कामकाजात काही सुधारणा करता येईल. या भावनेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून, सर्वसामान्यांना आपले मत नोंदवता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच यावेळी दिव्यांग बांधवांवर अन्याय झाल्यास दिव्यांग अधिनियम 2016 नुसार कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनला देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.