सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचा उपक्रम
वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी प्रयत्नशील -नामदेवराव चांदणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने मागासवर्गीय, आदिवासी कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वडगाव गुप्ता येथे समितीचे संस्थापक नामदेवराव चांदणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी फिरदोस सय्यद, मेजर सचिन शिरसाठ, भगवान जगताप, भीम आर्मी सेनेचे सुनील सकट, निलेश चांदणे, दादा चिंतामणी, वसंत साठे, विनोद चांदणे, राजू पवार, प्रशांत पवार, पार्वती चांदणे, यशोदा चांदणे, सय्यद मेजर आदी उपस्थित होते.
नामदेवराव चांदणे म्हणाले की, मागासवर्गीय, आदिवासी कुटुंबातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टाळेबंदीनंतर सर्वसामान्य घटकांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कार्य करणार असल्याचे सांगितले.
एनएसएस च्या माध्यमातून 75 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या लाल किल्ला येथील कार्यक्रमात राष्ट्रपती व पंतप्रधान समोर परेड करणारी फिरदोस सय्यद हिचा विशेष सत्कार करण्यात आला. भगवान जगताप यांनी विद्यार्थ्यांना हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसून, उच्च शिक्षित होऊन आपले ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले. निलेश चांदणे यांनी आभार मानले.