• Tue. Jul 8th, 2025

अल्पवयीन मुलीला दुसऱ्यांदा घेवून जाऊन अत्याचार

ByMirror

Jul 2, 2025

महिला उलटून देखील मुलीचा शोध लागत नसल्याने पिडीत कुटुंबीयांचे उपोषण


आरोपींवर पोस्कोचे वाढीव कलम लावून, अपमानास्पद वागणुक देणाऱ्या तपास अधिकारीवर कारवाईची मागणी

नगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीला दुसऱ्यांदा घेवून जाऊन अत्याचार करणाऱ्या आरोपींवर पोस्कोचे वाढीव कलम लावावे आणि महिला उलटून देखील मुलीचा शोध लागलेला नसताना पिडीत कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. तर फक्त उडवाउडवीचे उत्तरे व अपमानास्पद वागणुक देणारे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


श्रीगोंदा तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीला एका मुलाने व त्याच्या नातेवाईकांनी लग्नाचे आमिष दाखवून घेऊन गेले आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 25 मे रोजी मुलीला घेऊन जाणाऱ्यांनी तिला एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आणून दिले व नंतर श्रीगोंदा येथे आणून तिची मेडिकल टेस्ट करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयात जबाब झाले, मुलगी मधल्या काळात मुलाबरोबर असल्याने त्या मुलाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचे सांगितले.


या घटनेत तपास अधिकारी असलेले श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी कुठलाही तपास करुन आरोपींवर कुठलिही कारवाई न केल्याने पुन्हा मुलीला 3 जून रोजी उचलून नेण्यात आले. या प्रकरणी देखील श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. मुलीला दुसऱ्यांदा पुन्हा घेऊन जाण्याचे धाडस आरोपीने केले. 4 जून रोजी तपास अधिकारी यांना विचारणा केली असता, त्यांनी शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणुक दिली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

तर अल्पवयीन मुलीचा लवकरात लवकर शोध घ्यावा व आरोपींवर पोस्कोचे वाढीव कलम लावून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पिडीत कुटुंबीयांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *