नगर (प्रतिनिधी)- सावेडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, पूर्णवाद परिवाराचे ज्येष्ठ उपासक जयंत एकनाथराव जाधव (वय 66, रा. बलरामनगर बंगडीवाला चौक, बंधन लॉन परिसर) यांचे मंगळवारी (दि.20 मे) रात्री निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, भावजयी, बहिणी असा मोठा परिवार आहे. दिवंगत जाधव हे व्हिडिओकॉन कंपनीत अधिकारी होते. न्यू आर्ट्स महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागाच्या निवृत्त प्राध्यापिका हेमा जाधव यांचे ते पती होत. दिवंगत जाधव यांना फोटोग्राफी, नाट्यकला यामध्ये आवड होती. त्यांच्यावर मंगळवारी रात्री अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जयंत जाधव यांचे निधन
