नीट, जेई व सेट सारख्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी मिळणार मार्गदर्शन
नगर (प्रतिनिधी)- भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वसनीय शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आकाश इन्स्टिट्यूट च्या बारामती शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. 11वी, 12 वी तसेच नीट, जेई व सेट सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आकाश इन्स्टिट्यूटने आपली 36 वर्षांची यशस्वी परंपरा बारामतीत आणली असल्याची माहिती क्लासचे संचालक जसमितसिंग वधवा यांनी दिली.
या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराज दत्तात्रय भराणे (इमर्गिंग युथ लीडर), श्री. सुभाष सोमाणी (माजी नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद व संस्थापक, सोमाणी ग्रुप, बारामती), श्री. प्रणव सोमाणी (तरुण उद्योजक, बारामती) यांची प्रतिष्ठित उपस्थिती लाभली.
यासोबतच आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे स्टेट हेड विनय पांडे, सहाय्यक संचालक अमित शर्मा आणि व्यवस्थापक राम किर्तसिंह यांनी देखील या समारंभात सहभाग घेतला.
आकाश इन्स्टिट्यूटच्या या नवीन शाखेच्या माध्यमातून बारामती व परिसरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण सुविधा, अनुभवी मार्गदर्शक आणि उत्कृष्ट शैक्षणिक पर्यावरण उपलब्ध होणार आहे. संस्थेचा मुख्य उद्देश गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी समर्थ बनवणे हा आहे.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना क्लासचे संचालक जसमितसिंग वधवा आणि प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा संस्थेच्या उपलब्धतेचे महत्त्व अधोरेखित करुन आकाश इन्स्टिट्यूटला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.