स्वरा कर्डिले जिल्ह्यात दहावी तर शिवण्या गायकवाड जिल्ह्यात तेरावी
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे, राजर्षी शाहू बालक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. असून इयत्ता दुसरी मधील विद्यार्थिनी कु. स्वरा अशोक कर्डिले ही केंद्रात तिसरी व जिल्ह्यात दहावी तर कु. शिवण्या चंद्रकांत गायकवाड ही केंद्रात सहावी तर जिल्ह्यात तेरावी आली आहे.
संस्थेचे सचिव कोतकर सर, खजिनदार साठे सर, मुख्याध्यापिका रेणुका म्हस्के यांनी गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मुग्धा जगदाळे, कविता भोर, सुजाता काकडे, सुवर्णा करांडे, योगिता काळे, अनिता उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.