साताऱ्यातील कार्यक्रमासाठी तू ग दुर्गा! गीत सादर करणाऱ्या 14 मुलींना संधी
नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ता शाह हायस्कूल, भिंगार या विद्यालयाची सलग आठव्या वर्षी सातारा येथे होणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. रयत संस्थेच्या 752 शाखांमधून सदर शाळेच्या गीताची निवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या वतीने संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त 7 आणि 8 मे 2025 रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रयत संस्थेच्या 752 शाखांपैकी केवळ निवडक शाखांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. यंदाही उत्तर विभाग, अहिल्यानगर यांच्यामार्फत झालेल्या निवड प्रक्रियेतून श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ता शाह हायस्कूल, भिंगार या विद्यालयाच्या संघाची निवड झाली आहे.
या संघामध्ये 14 मुलींचा सहभाग असून त्यांनी सादर केलेल्या समाजप्रबोधनपर तू ग दुर्गा! या गीताचे विशेष कौतुक झाले. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख वर्षा ढगे, माधव रेवगडे, सुरेखा डोईफोडे आणि श्रीमती गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या वतीने सदर गीतांमधील मुलींची गुलाब पुष्प आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल माजी आमदार दादाभाऊ कळमकर, कु. रितू दीदी ॲबट, आमदार तथा विभागीय अध्यक्ष आशुतोष काळे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, तसेच विश्व शंकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण अनभुले, विद्यालयाचे पर्यवेक्षक संपत मुठे, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन करत मुलींच्या संघास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.