माजी आमदार अरुणकाकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी एकत्र आले समाजबांधव
नगर (प्रतिनिधी)- शहरातील ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवारी (दि. 8 एप्रिल) मशिदीत अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली.
अरुणकाका सध्या पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांच्याशी जवळचा संबंध असलेल्या मुस्लिम समाजातील अनेक व्यक्तींनी सोमवारी (दि. 7 एप्रिल) हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. मंगळवारी मशिदीत विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हाजी मन्सूर शेख, अख्तर सय्यद, मुन्नाशेठ चमडेवाले, आदनान शेख, जुनैद शेख, अखलाक शेख, हाजी नजीर, अजीज मोटर्सचे अज्जू भाई, मतीन शेख, अबरार पठाण, जी.एम. मोटर्सचे अय्युबभाई, अजमत इराणी, मुन्तझिम पठाण, अन्सार पठाण, रशिद पठाण, असद पठाण, समीर शेख, शाकीर शेख, सिद्दीक तांबोळी, नासीर पठाण, तबरेज शेख, रमीज शेख, मोहसीन शेख, फय्याज शेख, इकराम तांबटकर, फिरोज पठाण, सय्यद नाझ, अन्सार सय्यद आदी उपस्थित होते.
या वेळी हाजी मन्सूर शेख यांनी सांगितले की, अरुणकाका जगताप यांचे मुस्लिम समाजाशी आपुलकीचे नाते आहे. राजकारणापेक्षा समाजकारण जपणाऱ्या अरुणकाकांनी सर्व धर्मीयांशी स्नेह संबंध ठेवले आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, हीच प्रार्थना सर्वांनी अल्लाहकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.