पाबळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला झोक्यांची भेट
नगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वांगीन विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या शहरातील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने शिरुर तालुक्यातील (जि. पुणे) ग्रामीण भागातील पाबळ या गावाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मुलांना खेळण्यासाठी झोक्यांची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी बनविण्याच्या उद्देशाने सेवाप्रीतच्या सदस्यांनी शाळेच्या प्रांगणात चार झोके बसवून दिले.

विक्रम दत्त (पुणे) यांच्या समन्वयातून प्रकल्प प्रमुख सविता चड्डा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, डॉली मेहेता, रीटा सलूजा, शिल्पा सबलोक, रिद्धी मनचंदा, कैलाश मेहता, संगीता ओबेरॉय, अनिता शर्मा, बीना बत्रा, अनु ॲबट, करुणा मुनोत, दीपा चंगेडीया, सोनिया ॲबट, शिल्पा गांधी, कीर्ती बोरा, मंगल झंवर, आंचल बिंद्रा, अनिता गाडे, डॉली भाटिया, शारदा बिहानी, अर्पणा बोथरा, चैताली बोराटे, उषा ढवण, सुनिता गांधी, श्वेता गांधी, गीता शर्मा, मंगल झंवर, रुपा पंजाबी, कांचन नेहलानी, किटी मल्होत्रा, साधना कोठारी, मनीषा लोढा, मंगला झंवर, योजना बोठे, प्रीती सोनवणे, मंगला पिडीयार, रंजना झिंजे, विजया सारडा, सरिता बर्मेचा, वैशाली मालपानी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सेवाप्रीतने मुलांना हसत-खेळत शिक्षण घेता यावे, या उद्देशाने उपलब्ध करुन दिले आहेत. शिक्षण घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचा झोका वेगळ्या उंचीवर जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सविता चड्डा यांनी पाबळ या गावात गरीब शेतकरी व शेतमजुरांची मुले शिक्षण घेत आहे. त्यांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठी व त्यांची शिक्षणासाठी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने सेवाप्रीतच्या वतीने उपक्रम राबविण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. सेवाप्रीतच्या महिलांचे स्वागत सुवर्णा हरपुडे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बनकर यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून येवून महिलांनी मुलांना शाळेत खेळणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल विशेष आभार मानले.