• Thu. Mar 13th, 2025

होमिओपॅथीचे शिक्षण घेण्यासाठी ब्राझीलची महिला डॉक्टर नगर शहरात

ByMirror

Mar 6, 2025

जगभरातील डॉक्टरांना होमिओपॅथीचे आकर्षण -डॉ. प्रमोद लंके

नगर (प्रतिनिधी)- मानसिक व शारीरिक जीवन निरोगी बनविण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या होमिओपॅथीचे अद्यावत शिक्षण घेण्यासाठी ब्राझील येथील महिला डॉ. मिलीग्रीड बोरगस या शहरातील
होलिस्टिक क्लासिकल होमिओपॅथी क्लिनिक ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये आल्या आहेत. त्या रिसर्च सेंटरचे डॉ. प्रमोद लंके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष रुग्ण पाहून उपचार पद्धतीचा अभ्यास करत आहे.


डॉ. मिलीग्रीड बोरगस यांना होमिओपॅथी शास्त्राची आवड असल्याने ब्राझीलची राजधानी असलेल्या ब्रासलिआ शहरात मागील 10 वर्षापासून होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे. ॲलोपॅथी उपचाराच्या दुष्परिणामाने नागरिक होमिओपॅथीकडे प्रभावीत होत असताना, होमिओपॅथीचे अद्यावत ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्या भारतात नुकत्याच आल्या आहेत. तर ग्रीस येथील इंटरनॅशनल ॲकडमी ऑफ क्लासिकल होमिओपॅथी स्कूल संलग्न असलेल्या शहरातील होलिस्टिक क्लासिकल होमिओपॅथी क्लिनिक ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये विविध आजारांवर प्रत्यक्ष रुग्णांच्या उपाचर पध्दतीचा अभ्यास करत आहे.


डॉ. प्रमोद लंके यांनी आजारांना कायमचे मुळापासून नष्ट करण्यासाठी होमिओपॅथी या प्रभावी शास्त्राचा उपयोग लोककल्याणासाठी होत आहे. जगभरातील डॉक्टर होमिओपॅथीकडे आकर्षिले जात असून, अनेक दिग्गज डॉक्टर होमिओपॅथीद्वारे रुग्णांचे उपचार देखील करत आहे. दुर्धर आजारांच्या रुग्णांना याचा फायदा होत असल्याने परदेशातही मोठ्या संख्येने नागरिक होमिओपॅथीकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले.


ब्राझील मधून होमिओपॅथीच्या शिक्षणासाठी नगर शहरात आलेल्या डॉ. मिलीग्रीड बोरगस यांनी भारतात मोठ्या लोकसंख्येच्या प्रमाणामुळे विविध आजारांचे प्रत्यक्ष अनुभव शिकण्यास मिळत आहे. अनेक गंभीर व जुनाट आजार होमिओपॅथीने बरे होत असल्याने व त्याचे दुष्परिणाम नसल्याने नागरिकांमध्ये जागृती होत आहे. भारतात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग ब्राझील मधील रुग्णांसाठी नक्कीच चांगल्या प्रकारे होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *