वैयक्तिक पातळीवर अनाथांच्या सेवेसाठी राहणार तत्पर -भालसिंग
नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय विठ्ठल भालसिंग यांनी लासलगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथील जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते मागील 12 वर्षापासून निस्वार्थपणे या अनाथ विद्यार्थी आश्रमाची सेवा करत होते.
आश्रमाचे अध्यक्षपरमपूज्य स्वामी वासुदेवनंदगिरी (बहुरूपी महाराज) व आश्रमाचे व्यवस्थापक संचालक दिलीप गुंजाळ यांनी 11 ऑक्टोंबर 2012 रोजी मला नियुक्ती पत्र देऊन संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. भालसिंग यांनी अनाथ विद्यार्थी आश्रमाला मोलाचे सहकार्य करुन, अनाथ मुलांच्या दिंडीचे दरवर्षी नगर मध्ये स्वागत, विविध प्रकारे सेवा दिली आहे.
भालसिंग यांनी अनाथ मुलांची सेवा करण्याची संधी दिल्याने समाधान वाटले, परंतु एसटी बँकेत नोकरी असल्याने व कौटुंबिक अडीअडचणीमुळे या पदावर राहून काम करु इच्छित नाही. मात्र माझ्या माध्यमातून संस्थेविषयी व अनाथ मुलांविषयी असणारे निस्वार्थ कार्य अखंडितपणे सुरु राहणार आहे. अनाथांच्या सेवेसाठी मी व माझे कुटुंब नेहमीच तत्पर राहणार असल्याचे राजीनामा पत्रात त्यांनी म्हंटले आहे. राजीनामा त्यांनी आश्रमाचे व्यवस्थापक संचालक दिलीप गुंजाळ यांच्याकडे पाठविला आहे.