• Wed. Oct 15th, 2025

दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपने दिले शुभेच्छा

ByMirror

Feb 21, 2025

परीक्षा केंद्रावर पेन व गुलाबपुष्पाचे वाटप

विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा उपक्रम -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- शिक्षण मंडळाच्या दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेस शुक्रवार (दि.21 फेब्रुवारी) पासून प्रारंभ झाले. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अ.ए.सो.च्या भिंगार हायस्कूल मधील परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन व गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढून त्यांना मनमोकळ्या वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे, या उद्देशाने दरवर्षी ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.


याप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, रतनशेठ मेहत्रे, अभिजीत सपकाळ, दीपकराव धाडगे, मनोहरराव दरवडे, जालिंदर बोरुडे, धनंजय नामदे, राजू कांबळे, सदाशिव मांढरे, प्रांजली सपकाळ, उषाताई ठोकळ, वंदनाताई मेहेत्रे, मुख्याध्यापक आर.व्ही. कासार, उपमुख्याध्यापक भांड, पर्यवेक्षक सौ.एस.पी. गायकवाड, शाळा समिती सदस्य रवींद्र बाकलीवाल, किसनराव चौधरी, बापूसाहेब शिंदे आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील दहावी बोर्ड परीक्षा पहिली पायरी असून, या परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व तणावमुक्त पध्तीने पेपर जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *