• Fri. Mar 14th, 2025

आर्चिड प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Feb 15, 2025

चिमुकल्यांनी सादर केले कोळी नृत्य व ठसकेबाज लावणी

दृढ समाजासाठी मुलांच्या आहारावर लक्ष देण्याची गरज -पद्मश्री राहीबाई पोपरे

नगर (प्रतिनिधी)- स्पर्श सेवाभावी संस्था संचलित आलमगीर येथील आर्चिड प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पूर्व प्राथमिक च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. माऊली सभागृहात झालेल्या स्नेहसंमेलनात कोळी नृत्य व महाराष्ट्रातील लावणी सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. हिंदी-मराठी गीतांवर वैयक्तिक व समुह नृत्याचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.


स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी सीए शंकर अंदानी, लेखिका सरोज अल्हाट, सामाजिक कार्यकर्ते अमोल आल्हाट, ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी, सारिका शेलार, संचालक प्रवीण साळवे ,आर्चिड प्री स्कूलच्या प्राचार्या शितल साळवे,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्रास्ताविकात प्रविण साळवे यांनी वंचित घटकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी स्पर्श सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आर्चिड प्री स्कूल कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांच्या मधील कृतीशिलता विकसीत करण्याचे काम केले जात आहे. लहान वयातच शिक्षण व संस्काराने मुलांच्या जीवनाचा पाया भक्कम केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पद्मश्री राहीबाई पोपरे म्हणाल्या की, सदृढ समाजासाठी मुलांच्या आहारावर लक्ष देण्याची गरज आहे. मुलांना रासायनिक खतांद्वारे पिकवलेले अन्न मिळत असल्याने समाजात आजार वाढत आहे. मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती करुन अन्न पिकविण्याचे आवाहन केले. माती वाचली तर पुढची पिढी वाचणार असल्याचा संदेश त्यांनी दिला. तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. सरोज आल्हाट यांनी विद्यार्थ्यांना आर्चिड प्री स्कूलच्या माध्यमातून दिशा दिली जात आहे. मुलांच्या भवितव्यासह समाज घडविण्याचे कार्य संस्था करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्राचार्या शितल साळवे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची देऊन, वार्षिक अहवाल सादर केला. तर शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख मांडला.


चंदा चमके…, छोटा बच्चा जानके हमको…, चिटीया कलाईया…आदी गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम रंगले होते. विविध गीतांवर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोंडवे यांनी केले. आभार प्रविण साळवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुजाता अंगारखे, प्रियंका देवतरसे ,सुनिता बोर्डे , कविता हजारे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *