पालकमंत्री विखे यांना प्रहार अपंग क्रांती संघटने निवेदन
नगर (प्रतिनिधी)- प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून पाच टक्के रकमेचा खर्च करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी या मागणीचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.
निवेदनात सांगितले आहे की, शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आमदार स्थानिक विकास निधीच्या एकूण रकमेपैकी किमान पाच टक्के रक्कम दिव्यांग व्यक्तींसाठी विविध सुविधांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांना स्थानिक निधीतून दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के निधी खर्च करण्याबाबत सूचित करण्याचे म्हंटले आहे.
तसेच या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांना देखील निवेदन देऊन शहर मतदार संघात स्थानिक विकास निधीतून पाच टक्के रक्कम दिव्यांगांसाठी खर्च करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.