• Thu. Oct 16th, 2025

शिवजयंती पासून या अभियानाची होणार सुरुवात

ByMirror

Feb 10, 2025

कुटुंब, समाज आणि पर्यावरणासाठी एकत्रित कार्याचा संकल्प

राष्ट्रीय लोकभज्ञाक कुटुंब अभियान! कुटुंबसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि समाजासाठी एक महत्त्वाचे पाऊल -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय लोकभज्ञाक कुटुंब अभियान ही संकल्पना भारतीय समाजाच्या मूलभूत उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते, असे मत पीपल्स हेल्पलाइनचे ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले आहे. कुटुंबसंस्थेचे सशक्तीकरण हे केवळ सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठीच नव्हे, तर पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीच्या पुनरुज्जीवनासाठीही अत्यंत आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले. 19 फेब्रुवारीला शिवजयंती पासून या अभियानाची सुरुवात करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.


ॲड. गवळी यांनी या अभियानाच्या संकल्पनांची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना सांगितले की, माझे कुटुंब, माझी जबाबदारी या संकल्पनेने कुटुंबातील सर्व सदस्यांना परस्पर प्रेम, एकत्रित श्रम आणि जबाबदारीची जाणीव करून दिली जाईल. कुटुंब ही समाजाचा कणा आहे आणि कुटुंबशक्ती मजबूत झाल्यावर समाजही सशक्त होतो. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणातील शिस्त, श्रमसंस्कार आणि शिक्षण हे या अभियानाचे आधार बनले आहेत.


या अभियानामुळे कुटुंबसंस्था सुदृढ होईल, परस्पर प्रेम आणि सन्मान वाढेल, आणि मुलांना योग्य संस्कार मिळून त्यांचे व्यक्तिमत्व घडेल. पर्यावरण संरक्षण आणि जलसंधारणास चालना मिळेल, तसेच गुन्हेगारी कमी होऊन समाज अधिक जबाबदार बनेल. छत्रपती शिवाजी महाराज हे लोकभज्ञाक योद्धे होते, त्यांच्या विचारांवर आधारित ही चळवळ भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सशक्त पाऊल ठरेल, असा आशावाद ॲड. गवळी यांनी व्यक्त केला आहे.


राष्ट्रीय लोकभद्न्याक कुटुंब अभियान एक नवा अध्याय, एक सशक्त भारत! या आशेने या अभियानाला प्रारंभ करण्याची तयारी पीपल्स हेल्पलाईनने दर्शवली आहे.


अभियानातील प्रमुख उपक्रम:
कुटुंब लोकभद्न्याक दिन: प्रत्येक रविवारी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन घरकाम, बागकाम, स्वच्छता आणि ज्ञानवृद्धी यामध्ये सहभागी होणे.
बालशिवाजी घडविण्यासाठी मुलांना शिस्त, श्रमसंस्कार आणि आत्मनिर्भरतेची शिकवण देणे.
गाव आणि सोसायटी स्तरावर एकत्र श्रमदान: जलसंधारण, सामूहिक वृक्षारोपण आणि विहिरी पुनरुज्जीवन.
शाळा आणि कॉलेज स्तरावर लोकभद्न्याक संस्कार: विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण आणि समाजसेवेचे महत्त्व शिकवणे.
शासनस्तरावर अभियान राबवून, सरकारी योजनांशी समन्वय साधून अभियानाची पूर्तता करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *